फोन टॅपिंगप्रकरणात विरोधकांचा विधानसभेतून सभात्याग !

फोन टॅपिंग प्रकरणात अर्ध्या घंट्यांच्या चर्चेसाठी नियमानुसार १ घंटा आधी निवेदन दिले नसल्यामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चर्चा नाकारली. यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.

मुंबईमध्ये किती उंदीर मारले ? याच्या चौकशीसाठी सरकारकडून समितीची स्थापना !

मुंबईतील ५ प्रभागांमध्ये उंदीर मारण्यासाठी ५ कोटी रुपये इतका निधी देण्यात आला; परंतु महानगरपालिकेचे कर्मचारी कधीही उंदीर मारतांना दिसलेले नाहीत.

२ मासांत चौकशी करून दोषी आढळणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

कोयना धरणासाठी विस्थापित झालेल्यांना अजूनही जमिनीचे वाटप झालेले नाही. त्यातच सोलापूर येथील एका अधिकार्‍याने काही प्रकल्पग्रस्तांना एकाच जमिनीचे दोनदा वाटप केल्याचे समोर आले आहे.

अर्धा इंच जागाही कर्नाटकला देणार नाही !

सरकार सीमाभागातील ३६५ गावांतील मराठी भाषिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. बोम्मई यांच्या उद्दाम वागण्यामुळे मराठी माणसाचे रक्त सळसळले आहे.

राज्यात लवकरच मेडिकल बोर्डच्या माध्यमातून ४ सहस्र ५०० जागा भरणार ! – गिरीश महाजन, आरोग्यमंत्री

भरतीमध्ये आधुनिक वैद्यांची ३०० पदे भरली जाणार आहेत. ‘एम्.पी.एस्.सी.’मधून पदभरतीस वेळ लागतो. त्यामुळे ही भरती करण्यासाठी सरकार ‘मेडिकल बोर्ड’ सिद्ध करणार आहे.

३१ डिसेंबरपर्यंत इयत्ता बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आधारकार्डशी लिंक करणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

राज्यातील एकूण ५ लाख १३ सहस्र १६३ विद्यार्थ्यांता आधारकार्डशी लिंक करण्यात आले आहे. आधारकार्डशी लिंक केल्यामुळे विद्यार्थ्यांची २ वेळा नावे येणार नाहीत.

स्वमग्न मुलांवरील उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र चालू करणार ! – डॉ. तानाजी सावंत, सार्वजनिक आरोग्यमंत्री

प्रत्येक तालुक्यात पथके नियुक्त केली असून त्यांच्या वतीने स्वमग्नता आणि गतीमंदता या मेंदूविकारांविषयी विद्यार्थी अन् अंगणवाडीतील ० ते ६ वर्षे वयांच्या बालकांची पडताळणी करण्यात आली आहे.

येत्या शैक्षणिक वर्षात ३० सहस्र शिक्षकांची भरती करणार ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

‘प्रत्येक विषयासाठी शिक्षकाची नियुक्ती करण्यात येईल. शिक्षकांच्या भरतीमुळे शासनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबेल’, असे केसरकर यांनी सांगितले. 

भविष्यात उच्चशिक्षण मातृभाषेत दिले जाईल ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

भविष्यात उच्चशिक्षणही मातृभाषेत दिले जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली. 

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील महंत मार्तंड पशुपती यांचा शिरच्छेद करण्याची धमकी

उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचे सरकार असतांना महंतांना अशा धमक्या मिळणे अपेक्षित नाही. याप्रकरणी सरकारने दोषींवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे !