हडपसर (पुणे) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचे सुनील घनवट यांनी घेतली हिंदुत्वनिष्ठांची भेट !

हिंदु राष्ट्र-जागृती सभा यशस्वी करण्याचा समस्त हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार

बैठकीला उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

हडपसर (जिल्हा पुणे), २१ डिसेंबर (वार्ता.) – हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संपूर्ण देशभरात हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून रविवार, १ जानेवारी २०२३ या दिवशी सायंकाळी ६ वाजता कै. मारुतराव काळे प्राथमिक विद्यालयाचे मैदान, प्रगती शाळेजवळ, हडपसर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेची नियोजन बैठक येथील श्रीराम मंदिर येथे पार पडली. या बैठकीत हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा विषय प्रत्येक हिंदूपर्यंत पोचवण्याचा निर्धार हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सागर शिरोडकर यांनी केले. या वेळी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी सभेचा प्रसार, प्रत्यक्ष सभा आणि त्या अनुषंगाने आवश्यक सेवा यांमध्ये उत्स्फूर्त सहभाग दर्शवला.

श्री. सुनील घनवट बैठकीच्या प्रारंभी सभेचा उद्देश सांगतांना म्हणाले की, आज भारतात हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय यांवर अनेक आक्रमणे होत आहेत. यावर उपाय म्हणजे हिंदूंना जागृत आणि संघटित करणे ! त्यासाठी संपूर्ण देशभरात हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात येत आहेत. त्यासाठी हडपसर येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसाराच्या माध्यमातून हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती करण्यासाठी अधिकाधिक हिंदूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

उपस्थित मान्यवर

चिंतामणी प्रासादिक दिंडीचे ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, धर्मप्रेमी पंकज काकडे, निखिल तेलकर, अधिवक्ता सचिन चव्हाण, तुकाई माता मंदिराचे विश्वस्त सागर तुपे, ‘सुदर्शन न्यूज’ वाहिनीचे दयावान कुमावत, हडपसर येथील ब्राह्मण पुरोहित संघाचे सदस्य श्री. दत्तात्रय कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री पराग गोखले, महेश पाठक