हिंदूंवरील आघात रोखण्यासाठी धर्माचरण आवश्यक ! – हेमंत खत्री, हिंदु जनजागृती समिती

दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेस ८५० हिंदूंची उपस्थिती !

सभेला उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

दिग्रस (जिल्हा यवतमाळ), २१ डिसेंबर (वार्ता.) – लव्ह जिहादच्या माध्यमातून खोट्या प्रेमाचे नाटक करत हिंदु तरुणींना फसवण्याचे प्रकार घडत आहेत. यामागे धर्मांधांची मोठी यंत्रणा कार्यरत आहे. केरळ उच्च न्यायालयाने लव्ह जिहाद असल्याचे मान्य केले आहे. दिग्रस शहरासह संपूर्ण देशात अशा घटना घडत आहेत. या घटना रोखण्यासाठी धर्माचरणाची आवश्यकता आहे. शिक्षणाने लिहायला, वाचायला शिकू, पण नीतीमत्ता, धर्माचे संस्कार रुजवण्याचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे. लव्ह जिहादची प्रकरणे रोखण्यासाठी आपण संघटितपणे प्रयत्न केले पाहिजेत, तरच ‘लव्ह जिहाद’ला थांबवू शकतो, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत खत्री यांनी केले.

दिग्रस येथील श्री. मल्लिकार्जुन मंदिर सभागृह येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या सौ. भार्गवी क्षीरसागर यांनीही उपस्थितांना धर्माचरणाचे महत्त्व सांगितले.

या सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह शहर, तसेच आजूबाजूच्या गावांतील धर्माभिमानी हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी शंखनादानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. वेदमंत्रपठणानंतर हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा समितीचे यवतमाळ जिल्हा समन्वयक श्री. मंगेश खांदेल यांनी मांडला. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन श्री. अनिकेत अर्धापूरकर यांनी केले.

सभेनंतर धर्माभिमानी हिंदूंसाठी पुढील कृती करण्यासाठी २५ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता श्री. मल्लिकार्जुन मंदिर, दिग्रस या ठिकाणी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उपस्थित मान्यवर – ह.भ.प. महादेव महाराज माहुरे, ह.भ.प. जयराम महाराज गावंडे, तसेच श्री. मल्लिकार्जुन मंदिराचे विश्वस्त श्री. किशोर बनगीनवार, श्री. बालाजी मंदिराचे विश्वस्त डॉ. मुरलीधर राठी, श्री. घंटीबाबा मंदिराचे विश्वस्त डॉ. प्रदीप मेहता, दत्त मंदिराचे विश्वस्त श्री. राजेशभाऊ मुंडलिक, श्रीराम मंदिराचे विश्वस्त श्री. सुनील हरसुलकर, भाजपचे श्री. प्रमोद बनगीनवार, अधिवक्ता विवेक बनगीनवार, कु. कल्पना पवार, विश्व हिंदु परिषदेचे श्री. मनोज सरवैया, रा.स्व. संघाचे श्री. दत्तात्रय बनगीनवार, शिवतेज संघटनेचे संस्थापक श्री. संतोष झाडे, माजी नगराध्यक्ष श्री. रविभाऊ अरगडे, तसेच श्री. गोपाल रोडा, श्री. सुभाष अटल