हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी पेण येथे २५ डिसेंबरला हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

पेण येथील पत्रकार परिषदेत हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. सागर चोपदार यांची माहिती

डावीकडून सर्वश्री महेश पाटील, माणिक पवार, अमरसिंह परमार, सागर चोपदार, मोहन पारटे, मंगेश दळवी, समीर म्हात्रे

पेण, २१ डिसेंबर (वार्ता.) – निधर्मी भारतात हिंदूंवर निरनिराळे आघात होत आहेत. धर्मांतर, लव्ह जिहाद, हलाल जिहाद आदी षड्यंत्रे प्रतिदिन उघड होत आहेत. अशा अनेक समस्यांना वाचा फोडण्यासाठी, तसेच प्रत्येकाचा विचार करणारे आदर्श हिंदु राष्ट्र स्थापन होण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ डिसेंबर या दिवशी दुपारी ४.३० वाजता वाल्मिक निवास मैदान, मारुति मंदिराच्या मागे, कोळीवाडा, पेण येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हा समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी पेण येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.

या वेळी सकल हिंदु समाजाचे श्री. मोहन पारटे, धर्मप्रेमी महेश पाटील यांसह हलाल सक्तीविरोधी समितीचे सदस्य श्री. माणिक पवार आणि श्री. अमरसिंह परमार, सह्याद्री प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री. समीर म्हात्रे, तसेच पेण येथील ‘स्वराज्य प्रतिष्ठान’चे अध्यक्ष श्री. मंगेश दळवी हेही उपस्थित होते.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. सागर चोपदार यांनी रायगड जिल्ह्यात होणार्‍या धर्मांतराविषयीही सांगितले. हिंदु जनजागृती समिती आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे कार्यकर्ते पेणसह रायगड जिल्ह्यातील विविध भागांत बैठका, व्याख्याने, हस्तपत्रके, भित्तीपत्रके, फ्लेक्स फलक या माध्यमांतून प्रसार करत आहेत, तसेच व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक या सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमांतूनही मोठ्या प्रमाणात या सभेचा प्रसार करण्यात आला असून लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

पेण येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे थेट प्रक्षेपण http://Facebook.com/JagoHinduRaigad या हिंदु जनजागृती समिती-रायगड फेसबुक पेजद्वारे पहाता येणार आहे. सर्व धर्मप्रेमी हिंदूंनी पद, पक्ष, संघटना, संप्रदाय, जात-पात हे सर्व बाजूला सारून आता धर्मरक्षणासाठी एक हिंदू म्हणून या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी समितीच्या वतीने ८३६९१३२१४२ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उपस्थित मान्यवरांचे विचार

१. श्री. माणिक पवार, हलाल सक्तीविरोधी कृती समिती : हलालच्या माध्यमातून आपल्या अर्थव्यवस्थेवर आलेले संकट आपण एकत्र येऊन कृती करून त्यासाठी लढले पाहिजे. हलाल उत्पादनांवर बहिष्कार टाकला पाहिजे.

२. श्री. अमरसिंह परमार, हलाल सक्तीविरोधी कृती समिती : हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांवर एकत्रित होऊन लढल्यासच हिंदु राष्ट्र येईल ! पेण येथे सभेला हिंदूंनी सहस्रोंच्या संख्येने उपस्थित रहावे.

३. श्री. समीर म्हात्रे, सह्याद्री प्रतिष्ठान, उपाध्यक्ष : हिंदु जनजागृती समितीने घेतलेल्या पुढाकारासाठी मी समितीचे अभिनंदन करतो. या सभेला आमच्या संघटनेचे १०० टक्के साहाय्य असेल.

४. श्री. मोहन पारटे, सकल हिंदु समाज : पेणमधील मुसलमान आणि ख्रिस्ती हे हिंदूंच्या आर्थिक परिस्थितीचा अपलाभ घेऊन त्यांना आर्थिक आमिषे दाखवतात अन् त्यांच्या धर्मांतराचे प्रयत्न करतात. हिंदूंनी लव्ह जिहाद, लँड जिहाद, भूमी जिहाद यांविषयी भान बाळगावे. अन्य धर्मीय हात-पाय पसरत आहेत, हे सर्व रोखण्यासाठी संघटित बळ अत्यंत आवश्यक आहे. हिंदु संघटनांसमवेत समन्वय ठेवून त्यांना समजून घ्यायला हवे. सर्वांनी या सभेत उपस्थित राहून कृतीशील व्हावे !

५. श्री. मंगेश दळवी, स्वराज्य प्रतिष्ठान, अध्यक्ष, पेण विभाग : सर्वच हिंदूंना सभेमध्ये सहभागी करून घ्यायचे आहे आणि धर्मासाठी संघटित होऊन कृतीशील व्हायचे आहे.