दौंड (पुणे) येथे ३ धर्मांधांसह अन्य ५ जणांवर गुन्हा नोंद !

गोवंशहत्या बंदी कायदा अस्तित्वात येऊनही गोवंशियांची अवैध वाहतूक होते, हे लज्जास्पद आहे ! या कायद्याला धाब्यावर बसवणार्‍यांना कठोर शिक्षा झाली, तरच असे प्रकार थांबतील !

श्री महालक्ष्मी मंदिरातील गरुड मंडपात देवस्थान समितीच्या वतीने गाय-वासराची पूजा !

श्री महालक्ष्मी मंदिरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने गरुड मंडपात गाय-वासरू यांची पूजा करण्यात आली. या प्रसंगी समितीचे सचिव श्री. शिवराज नाईकवाडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

डोंबिवली येथे महानगरपालिकेच्या निष्क्रीय कारभाराच्या विरोधात नागरिकांचे आंदोलन !

नागरिकांवर आंदोलनाची वेळ येणे, हे महानगरपालिका प्रशासनाला लज्जास्पदच ! महापालिकेतील कर्तव्यचुकार अधिकार्‍यांना बडतर्फच करायला हवे !

श्री महालक्ष्मी मंदिरात वसुबारसच्या निमित्ताने श्री महालक्ष्मीदेवीची विशेष अलंकारिक पूजा !

दीपावलीचा प्रारंभ झाला असून साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात श्री महालक्ष्मीदेवीची वसुबारसच्या (२१ ऑक्टोबर) निमित्ताने विशेष अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती. यात देवीच्या मूर्तीसमोर गाय-बछडा यांची प्रतिकृती ठेवण्यात आली होती.

नवी मुंबई येथून १ कोटी २९ लाख रुपयांचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त !

यामध्ये ३७ लाख रुपयांच्या खाद्यतेलासह इतर मसाल्यांच्या पदार्थांचा समावेश आहे. या प्रकरणी ४ व्यापार्‍यांवर कारवाई केल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे कोकण विभागागीय सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी दिली.

पुणे येथे नियमांचे उल्लंघन करणार्‍या १९२ खासगी बसगाड्यांवर कारवाई, १५ लाखांचा दंड वसूल !

आर्थिक लुटीला आळा घालण्यासाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे परिवहन विभागाने विशेष तपासणी मोहीम चालू केली आहे. या मोहिमच्या वेळी आर्.टी.ओ.चे नियम पाळले जात नसल्याचे आढळून आले आणि बसमध्ये प्रत्यक्ष क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवण्यात आल्याचे आढळून आले.

राज्यातील एस्.टी.च्या भाड्यात १० टक्क्यांची शुल्कवाढ लागू !

एकीकडे खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून प्रवाशांची लूट चालू असतांनाच राज्य परिवहन महामंडळाने ऐन दिवाळी सणाच्या कालावधीत एस्.टी.च्या प्रवासी भाड्यात २० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून १० टक्क्यांची शुल्कवाढ केली आहे.

कल्याण येथे १७ लाख ८ सहस्र रुपयांची वीजचोरी !

कल्याण पश्चिम विभागात ॲल्युमिनियम फ्रेम कोटिंग (अनोडायझिंग) करणार्‍या औद्योगिक ग्राहकाने १७ लाख ८ सहस्र रुपयांची वीजचोरी केली. महावितरण आस्थापनाच्या पथकाने केलेल्या कारवाईत हे उघड झाले आहे. तो मागील वर्षभरापासून न्यूट्रल नियंत्रणाद्वारे वीजमीटरचा ‘डिस्प्ले’ बंद करून वीजचोरी करत होता.

जालना येथील जांबसमर्थ मंदिरातील मूर्तींच्या अन्वेषणासाठी विशेष अन्वेषण पथकाची स्थापना !

दीड मास होऊनही पोलिसांना मूर्ती चोरणार्‍या गुन्हेगारांचा शोध लागत नाही, हे लज्जास्पद आहे. असे कुचकामी पोलीस गल्लीबोळात लपलेले आतंकवादी आणि मोठ्या दरोड्याच्या गुन्ह्यांतील गुन्हेगारांना कसे पकडणार ?

ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात थुंकणार्‍या रिक्शाचालकावर दंडात्मक कारवाई !

रस्त्यावर ‘थुंकू नये’, हे सांगावे लागते, हा स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांमध्ये सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचाच परिणाम !