जालना येथील जांबसमर्थ मंदिरातील मूर्तींच्या अन्वेषणासाठी विशेष अन्वेषण पथकाची स्थापना !

जांबसमर्थ मंदिरातील मूर्ती

जालना – जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील मंदिरातून विविध देवतांच्या मूर्ती चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. या प्रकरणांच्या अन्वेषणासाठी पोलिसांची विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत; परंतु दीड मास उलटूनही मूर्तींचा शोध लागला नाही. (निष्क्रीय पोलीस यंत्रणा ! – संपादक) त्यामुळे या मूर्तींच्या अन्वेषणासाठी आता संभाजीनगर परिक्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यांतील पोलीस अधिकार्‍यांचे विशेष अन्वेषण पथक (एस्.आय.टी) नेमण्यात आले आहे.

यात विविध जिल्ह्यांतील पोलीस अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. ते जालना येथेच स्थायिक होऊन या गुन्ह्यांचे अन्वेषण करणार आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे आणि पोलीस महानिरीक्षक याविषयी दैनंदिन आढावा घेणार आहेत. या एस्.आय.टी. पथकामध्ये संभाजीनगर, जालना आणि धाराशिव येथील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकार्‍यांचा समावेश आहे.

संपादकीय भूमिका 

दीड मास होऊनही पोलिसांना मूर्ती चोरणार्‍या गुन्हेगारांचा शोध लागत नाही, हे लज्जास्पद आहे. असे कुचकामी पोलीस गल्लीबोळात लपलेले आतंकवादी आणि मोठ्या दरोड्याच्या गुन्ह्यांतील गुन्हेगारांना कसे पकडणार ?