श्री महालक्ष्मी मंदिरात वसुबारसच्या निमित्ताने श्री महालक्ष्मीदेवीची विशेष अलंकारिक पूजा !

श्री महालक्ष्मीदेवीची गाय-बछडा यांच्या प्रतिकृतीसह पूजा

कोल्हापूर – दीपावलीचा प्रारंभ झाला असून साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात श्री महालक्ष्मीदेवीची वसुबारसच्या (२१ ऑक्टोबर) निमित्ताने विशेष अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती. यात देवीच्या मूर्तीसमोर गाय-बछडा यांची प्रतिकृती ठेवण्यात आली होती.