निलंगा (लातूर) येथे दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के

जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात ९ ऑक्टोबर या दिवशी दिवसभरात दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पहिल्या भूकंपाची तीव्रता २.१ रिश्टर स्केल इतकी होती, तर दुसर्‍या भूकंपाची तीव्रता १.९ रिश्टर स्केल इतकी होती

तुर्भे येथे ४ वीजचोरांकडून ६ लाख २९ सहस्र रुपयांची वसुली !

‘वीज’ या राष्ट्रीय संपत्तीची चोरी केल्याप्रकरणी केवळ दंडात्मक कारवाई नव्हे, तर अशांना कारागृहात टाकण्याची शिक्षा केली, तरच कारवाईचा धाक निर्माण होऊन असे कृत्य करण्यास कुणीही धजावणार नाही !

कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने ६ लाख भाविकांनी घेतले श्री भवानीदेवीचे दर्शन !

सर्वाधिक भाविक सोलापूर येथून पायी चालत दर्शनासाठी आले होते. या मार्गावरील सर्व वाहतूक दोन दिवसांपूर्वी बंद करण्यात आली होती. ही वाहतूक बायपास मार्गे ५० किलोमीटर अंतरावरून वळवण्यात आली होती.

प्रभु श्रीरामाने ठाकरे यांचे धनुष्यबाण हिसकावून घेतले ! – राणा दांपत्य

शिवसेनेचे धनुष्यबाण हे प्रसिद्ध चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले आहे. या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार नवनीत राणा आणि खासदार रवी राणा यांनी ‘मातोश्री निवासस्थानासमोर हनुमानचालिसा पठण करण्यासाठी गेल्यावर आम्हाला १४ दिवस कारागृहात टाकून आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा नोंद केला.

अणूयुद्धाचा धोका !

अणूबाँबचा वापर जर झालाच, तर विनाशाखेरीज काहीच या पृथ्वीवर नसणार, हे सर्वांनाच ठाऊक आहे. तो टाळण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. यासाठी भारताने पुढाकार घ्यावा, असेच जगालाही वाटत आहे. मोदी यांनी एक पाऊल टाकले होते आणि त्यांनी आणखी एक पाऊल टाकावे, हे जगाच्या भल्यासाठी योग्य ठरेल.

मुलायम !

मुलायमसिंह समाजवादीपेक्षा ‘कारसेवकांवर गोळ्या झाडण्याचा आदेश देणारी व्यक्ती’ म्हणून हिंदूंच्या लेखी त्यांची ओळख असणार, यातही दुमत असण्याचे कारण नाही. त्यांनी रामभक्तांवर गोळ्या झाडण्याचा आदेश दिल्याविषयी कधीही क्षमायाचना केली नाही, हे लक्षात घ्यायला हवे !

संभाजीनगर येथे बसमधून बाहेर डोकावणार्‍या विद्यार्थ्याला खांबाची धडक बसून मृत्यू

नववीतील हा विद्यार्थी बसच्या खिडकीतून डोके बाहेर काढून पहात असतांना बसने वळण घेतल्यावर तेथील एका खांबाला त्याचे डोके आपटले आणि तो घायाळ झाला.

सातारा येथे चिकनगुनिया आणि डेंग्यू यांच्या रुग्णसंख्येत वाढ !

जिल्ह्यात डेंग्यू, चिकनगुनिया या रोगांच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. डेंग्यूचे ३१८, तर चिकनगुनियाचे ३८ रुग्ण आढळून आले आहेत. वातावरणातील पालटांमुळे रुग्णसंख्या वाढल्याचे म्हटले जाते.

बंगालची बांगलादेशच्या दिशेने वाटचाल !

बंगालमधील मोमीनपूर येथे ‘मिलाद-उन-नबी’ उत्सवाच्या वेळी प्रचंड हिंसाचार आणि तोडफोड झाली. या वेळी हिंदूंची अनेक वाहने आणि दुकाने यांची तोडफोड करण्यात आली.

‘बॉलिवूड’मधून जाणीवपूर्वक हिंदु धर्माला लक्ष्य केले जात आहे ! – रमेश सोलंकी, हिंदू आय.टी. सेल

बॉलिवूडमधील सर्व पैसा हा गुन्हेगारी जगताचा असल्यामुळे जाणीवपूर्वक हिंदु धर्माला लक्ष्य करणारे चित्रपट आणि मालिका बनवल्या जात आहेत. त्यातून सहस्रो कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केला जात आहे.