मुंबई – शिवसेनेचे धनुष्यबाण हे प्रसिद्ध चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले आहे. या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार नवनीत राणा आणि खासदार रवी राणा यांनी ‘मातोश्री निवासस्थानासमोर हनुमानचालिसा पठण करण्यासाठी गेल्यावर आम्हाला १४ दिवस कारागृहात टाकून आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा नोंद केला. त्यामुळेच प्रभु श्रीराम यांनी उद्धव ठाकरे यांचे धनुष्यबाण हिसकावून घेतले’, अशी टीका केली आहे.