दीपावलीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची आर्थिक लूट रोखण्यासाठी कार्यवाही करा !

हिंदु जनजागृती समितीचे सुराज्य अभियानाअंतर्गत परिवहन अधिकार्‍यांना निवेदन 

संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ !

पत्राचाळीतील १०३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सहभाग असल्याचा आरोप ईडीने केली आहे.

शिवसेनेसाठी नवीन चिन्ह क्रांती घडवेल ! – संजय राऊत, शिवसेना

शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यांनतर नवीन चिन्हाविषयी चर्चा चालू असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘नवीन चिन्हच शिवसेनेसाठी क्रांती घडवेल. आमच्यात शिवसेनेचे ‘स्पिरीट’ आहे’, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे कारागृहात असलेले खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

सावरकरांविषयी बोलण्यापूर्वी राहुल गांधींनी भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाचा अभ्यास करावा ! – जगदीश मुळीक, भाजप शहराध्यक्ष

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण

कन्हान (नागपूर) येथील हनुमान मंदिरातून पितळ्याच्या गदेची चोरी

जिल्ह्यातील कन्हान येथील हनुमान मंदिरातील पितळ्याची गदा एका युवकाने चोरून नेली. ही घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे. चोरी करण्यापूर्वी युवकाने हनुमानाच्या मूर्तीला नमस्कार केला, प्रसाद ग्रहण केला आणि नंतर गदा चोरली.

जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरील स्थगिती उठवली ! – दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक

जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरील स्थगिती उठवण्यात आली आहे. १ सहस्र कोटी रुपयांचा निधी संमत झाला असून त्यांपैकी २७५ कोटी रुपये मिळाले आहेत.

अश्लील व्हिडिओद्वारे फसवणूक करत वृद्धाकडून १८ लाख रुपये लुटले !

पैशांच्या मागणीला प्रतिसाद न देता सायबर गुन्ह्यांविषयी सतर्कता बाळगा !

‘मध्यान्ह भोजन योजना’ बंद करण्यासाठी बीडमध्ये कामगारांचा भव्य मोर्चा !

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून यातील अडचणी का सोडवत नाही ?

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलनाची चेतावणी ! – स्वाभिमानी शेतकरी संघटना

राज्यातील शेतकर्‍यांचा विरोध झुगारून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलन उभारण्याची चेतावणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिली आहे. कणेरी मठ येथील कार्यक्रमासाठी आलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाकडून निवेदन देण्यात आले.

जगाची वाटचाल अत्यंत कठीण आणि भयंकर मार्गावर चालली आहे ! – सुरेश प्रभु, माजी केंद्रीय मंत्री

सध्या जागतिक आर्थिक घडी बिघडल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात जागतिक आर्थिक मंदीचे सावट येण्याची शक्यता आहे. यासह देशाला पर्यावरणात होणार्‍या पालटांचे परिणाम भोगावे लागतील.