संभाजीनगर – येथील औरंगपुरा भागात बसमधून बाहेर डोके काढून पहाणार्या हरिओम पंडित नावाच्या विद्यार्थ्याचा खांबाला धडकून मृत्यू झाला. नववीतील हा विद्यार्थी बसच्या खिडकीतून डोके बाहेर काढून पहात असतांना बसने वळण घेतल्यावर तेथील एका खांबाला त्याचे डोके आपटले आणि तो घायाळ झाला. एका महिला रिक्शाचालकाने त्याला तात्काळ रुग्णालयात नेले; परंतु उपचाराच्या वेळी त्याचा मृत्यू झाला. पुरेशी जागा नसतांना बसने वळण घेतल्यामुळे हा प्रकार झाल्याचीही चर्चा आहे.