मुले असंस्कारी असल्याचा परिणाम !

‘ मातृदेवो भव । पितृदेवो भव ।’ म्हणजे ‘आई आणि वडील यांना देव मानावे’, असे मुलांवर बालपणी संस्कार न करणाऱ्या आईवडिलांसंदर्भात मोठ्या झालेल्या मुलांची वृत्ती ‘गरज सरो वैद्य मरो ।’ अशी होते. त्यामुळे ती आई-वडिलांना वृध्दाश्रमात ठेवतात, यात आश्चर्य ते काय ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पुणे येथील चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी वाहतूक मार्गांत पालट !

जुना पूल स्फोटकांद्वारे पाडण्यात येणार आहे. हे काम करतांना आणि पूल पाडल्यानंतर तेथील राडारोडा उचलण्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना तेथून प्रवास करण्यास प्रतिबंध करण्याविषयीचे आदेश दिले आहेत.

श्री तुळजाभवानीदेवीची पाचव्या दिवशी मुरली अलंकार पूजा !

श्री तुळजाभवानीदेवीची चौथ्या दिवशी रथ अलंकार महापूजा बांधली होती. ही महापूजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी अर्पण केलेल्या सुवर्ण अलंकारात बांधली होती.

छगन भुजबळ यांनी हिंदूंची क्षमा मागावी ! – भाजपची मागणी

क्षमा न मागितल्यास त्यांना भाजपच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी चेतावणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. भाजपच्या वतीने तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी मुळीक बोलत होते.

गोंगाटात आराधना करणे शक्य नसल्याने गरब्यासाठी आधुनिक ध्वनीयंत्रणेची आवश्यकता नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्यानेच त्यांच्या उत्सवांचे पाश्चात्त्यीकरण झाले आहे  !

अमरावती येथील विमानतळ चालू होण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट !

३० सप्टेंबर या दिवशी ही याचिका संमत करून उच्च न्यायालयाने संबंधित विभागांना नोटिसा बजावल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यात नोव्हेंबर २०२२ पर्यंत ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवले जाणार ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

या वेळी प्रथितयश अधिवक्ता प्रवीणचंद्र जंगले, हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता गोविंद तिवारी आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस उपस्थित होते.

मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे कोकेन जप्त !

येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर २८ सप्टेंबर या दिवशी मुंबई सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांनी ५ कोटी रुपयांचे ४९० ग्रॅम कोकेन जप्त केले.

खासगी महाविद्यालयाने शुल्क न्यून करावे, आम्ही (सरकार) प्राध्यापकांचे वेतन देतो ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री

राज्यातील खासगी महाविद्यालय जास्त शुल्क आकारत असल्याने शिक्षण महाग झाले आहे. प्राध्यापकांचे वेतन या शुल्कातून करत असल्याचे महाविद्यालयाचे म्हणणे आहे; मात्र सरकार खासगी महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या वेतनाचे दायित्व घेईल; पण त्यांनी शुल्क अल्प आकारावे,

‘लोन ॲप’ फसवणूक प्रकरणी ९ जण कह्यात !

महिलेला ‘लोन ॲप’ डाऊनलोड करायला सांगून मागणी केली नसतांनाही कर्ज संमत करून त्याचे पैसे व्याजासहित परत करण्यासाठी धमकावून १ लाख ११ सहस्र रुपयांची खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी बेंगळुरू येथून ९ जणांना कह्यात घेतले आहे.