छगन भुजबळ यांनी हिंदूंची क्षमा मागावी ! – भाजपची मागणी

पुणे – श्री सरस्वतीदेवीची प्रतिमा शाळेत कशासाठी ? असे विधान करून नवरात्र उत्सवात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी क्षमा मागावी’, अशी मागणी भाजपने केली आहे. क्षमा न मागितल्यास त्यांना भाजपच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी चेतावणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. भाजपच्या वतीने तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी मुळीक बोलत होते.