श्री तुळजाभवानीदेवीची पाचव्या दिवशी मुरली अलंकार पूजा !

श्री तुळजाभवानीदेवीची चौथ्या दिवशी बांधण्यात आलेली रथ अलंकार महापूजा

तुळजापूर (जिल्हा धाराशिव), ३० सप्टेंबर (वार्ता.) – श्री तुळजाभवानीदेवीची पाचव्या दिवशी ‘मुरली अलंकार पूजा’ बांधण्यात आली. भगवान श्रीकृष्णाने जगदंबा मातेला स्वत:ची मुरली (बासरी) दिली, त्या प्रसंगाची आठवण म्हणून ही पूजा बांधण्यात आली होती. श्री तुळजाभवानीदेवीची चौथ्या दिवशी रथ अलंकार महापूजा बांधली होती. ही महापूजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी अर्पण केलेल्या सुवर्ण अलंकारात बांधली होती.