अमरावती येथील पोलीस आयुक्तांनी ‘वसुली पथक’ नेमले  ! – आमदार रवि राणा यांचा आरोप

येथील पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी ‘वसुली पथक’ नेमले होते. या वसुलीमुळेच शहरात गुन्हे वाढून दंगल झाली. उमेश कोल्हे यांची हत्या झाली. आमच्या विरोधात प्रविष्ट केलेले खोटे गुन्हे आणि आरती सिंह यांनी केलेली अवैध वसुली या संदर्भात…

शिवाजी विद्यापिठाच्या पेपरफुटी आणि परीक्षा निकालातील गोंधळाविषयी अभाविपचा कुलसचिवांना घेराव !

विद्यार्थ्यांना येणार्‍या समस्यांची विद्यापीठ प्रशासन नोंद का घेत नाही ? विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागणे, हे विद्यापीठ प्रशासनासाठी लज्जास्पद आहे !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्री गणेशचतुर्थीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४० हून अधिक ठिकाणी धर्मप्रेमींना हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा

हिंदु जनजागृती समितीने श्री गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात देवगड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, बांदा आणि दोडामार्ग या तालुक्यांतील एकूण १४० हून अधिक ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमांत उपस्थित धर्मप्रेमींनी हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेतली.

राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानंतरच कोल्हापूर महापालिकेवर कारवाई !

पंचगंगा नदी प्रदूषित केल्याच्या प्रकरणी कोल्हापूर महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाने २६ ऑगस्टला २ कोटी २० लाख रुपये दंडाची नोटीस बजावली आहे. ‘सुभाष स्टोअर्स’मधील सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळून पंचगंगा प्रदूषित होते…

परस्पर निर्णय दिल्याविषयी देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना जाब विचारला !

यापुढे कोणत्याही मंत्र्याने अशा सवंग घोषणा करण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करावी, परस्पर घोषणा करू नये, अशी सक्त ताकीद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांच्यासह उतावीळ मंत्र्यांना दिली.

ईश्वराची अर्चना समजूनच कलाकारांनी कलेचे सादरीकरण करावे ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

कलेच्या सादरीकरणाद्वारे समाजातील अनेकांच्या तोंडवळ्यावर हसू आणणे, हे ईश्वरी कार्य आहे. ईश्वराची अर्चना समजूनच कलाकारांनी कलेचे सादरीकरण करावे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

पुण्यातील निर्बंधमुक्त मिरवणूक, पोलिसांचे ढिसाळ नियोजन, मंडळांवर कारवाई यांविषयी हलगर्जीपणा याविषयी पोलिसांना पुणेकरांकडून नोटीस !

श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करण्यात आले. मानाच्या गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणुकीसाठी घेतलेला अधिक वेळ, ढोल-ताशा पथकांतील वादकांची संख्या मर्यादित ठेवण्याकडे..

बलात्काराप्रकरणी मनसेच्या मलबार हिल येथील विभाग अध्यक्षाला अटक

आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तिकीट मिळवून देण्याचे आमीष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार एका ४२ वर्षीय महिलेने केली आहे.

पसार झालेल्या एका आरोपीची माहिती देण्यासाठी ‘एन्.आय.ए.’ने घोषित केले २ लाखांचे पारितोषिक !

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील ‘मास्टरमाईंड’ इरफान शेख हा मौलवी मुश्फिक अहमद याला आदर्श मानतो. नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारी पोस्ट पुढे पाठवल्याने मुश्फिक याच्या सांगण्यावरून अमरावतीच्या कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती.

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सिद्ध करण्यासाठी सर्वंकष विचार घेणार !

श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर पालखी तळ आणि मार्ग विकास आराखड्याच्या अंतर्गत पंढरपूर अन् पालखी मार्ग यांवर भाविकांना पायाभूत सुविधा देण्याच्या अनुषंगाने नव्याने समाविष्ट करायच्या कामांचा आराखडा सिद्ध करण्यात येत आहे.