राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानंतरच कोल्हापूर महापालिकेवर कारवाई !

कोल्हापूर, १३ सप्टेंबर (वार्ता.) – पंचगंगा नदी प्रदूषित केल्याच्या प्रकरणी कोल्हापूर महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाने २६ ऑगस्टला २ कोटी २० लाख रुपये दंडाची नोटीस बजावली आहे. ‘सुभाष स्टोअर्स’मधील सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळून पंचगंगा प्रदूषित होते, असे नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले असून या प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाकडे सुनावणी चालू आहे.

‘हरित लवादाच्या निर्णयानंतरच कोल्हापूर महापालिकेवर पुढील कारवाई केली जाईल’, अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांनी दिली.