‘पी.एफ्.आय.’वरील कारवाईवर विरोधकांचे मौन का ? – केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ते, भाजप

संपूर्ण देश पी.एफ्.आय.च्या विघातक कारवायांची उकल करणार्‍या अन्वेषण यंत्रणांच्या पाठीशी असतांना क्षुल्लक राजकारणापोटी या कारवायांवरच प्रश्नचिन्हे निर्माण करणार्‍या विरोधकांचा हेतू शंकास्पद आहे, असा आरोप उपाध्ये यांनी केला आहे.

अन्वेषण भरकटवण्यासाठी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा ! – डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे

शिवसेनेच्या वतीने नवरात्रीमध्ये महिलांच्या वतीने ‘दार उघड बया’ मोहीम राबवण्यात येणार आहे. सर्व महिला नेत्यांची आदित्य ठाकरेंच्या समवेत बैठक झाली असून, नवरात्रीत सर्व महिला कार्यकर्त्या महाराष्ट्रातील ३ देवींच्या शक्तिपिठाला जाणार आहेत.

अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घाला !

मुळात अशी मागणी करावी लागणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद नव्हे का ? उघडपणे अमली पदार्थांची विक्री होते, यावरून गुन्हेगारांना पोलिसांचे भय राहिले नसल्याचे स्पष्ट होत आहे !

मेट्रोच्या कामामुळे विलेपार्ले येथे ८ घरे कोसळली, ४० पेक्षा अधिक घरांना तडे

विलेपार्ले पश्चिमेकडे जुहू रोड इंदिरानगर परिसराजवळ ३० दुमजली झोपड्या आहेत. याच झोपड्यांजवळ मेट्रोचे काम चालू आहे. मेट्रोच्या कामाच्या हदर्‍यांमुळेच झोपड्या कोसळल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

नारायण राणे यांच्या बंगल्यातील अवैध बांधकाम पाडण्याचा निर्णय सर्वाेच्च न्यायालयाकडून कायम !

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात नारायण राणे यांनी सर्वाेच्च न्यायालयात अर्ज केला होता; मात्र सर्वाेच्च न्यायालयाने राणे यांचा अर्ज फेटाळून लावला.

मांसाहारी खाद्यपदार्थांच्या विज्ञापनांवर बंदी घालण्याचे अधिकार नसल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली !

मांसाहारी खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवर बंदी घालण्याची मागणी ३ जैन संस्थांनी याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयामध्ये केली होती, असे बंदी घालण्याचे अधिकार न्यायालयाला नाहीत, कायदेमंडळाला आहेत, असे सांगून उच्च न्यायालयाने या विषयीची याचिका फेटाळून लावली आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ‘हिंदु धर्मशिक्षण संस्कारवर्ग उपासना’ पुस्तकाचे प्रकाशन !

या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंगांच्या चित्रांचे प्रदर्शन, जुन्या काळातील काही नाण्यांचे, तसेच विविध ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

मंचकी निद्रेनंतर घटस्थापनेच्या दिवशी श्री तुळजाभवानीदेवी सिंहासनावर प्रतिष्ठापित !

घटस्थापनेच्या मध्यरात्री १ वाजता १७ सप्टेंबरपासून चालू झालेली श्री तुळजाभवानीदेवीची मंचकी निद्रा पूर्ण झाली. विधीवत् आणि परंपरागत पद्धतीने श्री तुळजाभवानीदेवीच्या भोपे पुजारी बांधवांनी देवीची मूर्ती पलंगावरून मुख्य सिंहासनावर प्रतिष्ठापित केली.

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ !

नवरात्र म्हणजे केवळ देवीचा आनंद उत्सव नसतो, तर स्वतःच्या आत्मिक शक्तीला जागे करण्याचे एक महत्त्वाचे पर्व होय. या अनुष्ठानाची पहिली पात्रता म्हणजे स्थिरता होय. ही स्थिरता येण्यासाठी आसनस्थ असणे आवश्यक आहे.

श्री महालक्ष्मी मंदिरातील सशुक्ल ‘ई-पास’ला कोल्हापूर येथील न्यायालयाने अनुमती नाकारली !

भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा विरोध असतांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने बळजोरीने नवरात्रोत्सव काळात २०० रुपये आकारून सशुक्ल ‘ई-पास’ देण्याचा निर्णय घेतला होता.