अन्वेषण भरकटवण्यासाठी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा ! – डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे

डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे

पुणे – पोलिसांचे लक्ष इतरत्र वळावे; म्हणून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. त्या पी.एफ्.आय.च्याच कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी विधान परिषदेच्या उपाध्यक्षा आणि शिवसेना नेत्या (सौ.) नीलम गोर्‍हे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलतांना केली आहे.

शिवसेनेच्या वतीने नवरात्रीमध्ये महिलांच्या वतीने ‘दार उघड बया’ मोहीम राबवण्यात येणार आहे. सर्व महिला नेत्यांची आदित्य ठाकरेंच्या समवेत बैठक झाली असून, नवरात्रीत सर्व महिला कार्यकर्त्या महाराष्ट्रातील ३ देवींच्या शक्तिपिठाला जाणार आहेत. त्या ठिकाणी राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि दिशा कायदा यांविषयी राज्य सरकारला जाग यावी यासाठी आमची मोहीम असणार आहे, अशी माहितीही डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे यांनी दिली.