श्री महालक्ष्मी मंदिरातील सशुक्ल ‘ई-पास’ला कोल्हापूर येथील न्यायालयाने अनुमती नाकारली !

कोल्हापूर – भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा विरोध असतांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने बळजोरीने नवरात्रोत्सव काळात २०० रुपये आकारून सशुक्ल ‘ई-पास’ देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला श्रीपूजक श्री. गजानन मुनीश्वर यांनी दिवाणी न्यायालयात आव्हान दिले. या विषयावर गेल्या आठवड्यात सुनावणी होऊन न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली होती. यावर २६ सप्टेंबरला पुढील सुनावणी झाली असता न्यायाधीश के.आर्. सिंघेल यांनी सशुक्ल ‘ई-पास’ला अनुमती नाकारली आहे.