सनातन संस्थेच्या वतीने कराड येथील ग्रंथप्रदर्शन कक्षाचा प्रारंभ !

नवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने श्री दैत्यनिवारणी मंदिर या ठिकाणी सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचा कक्ष लावण्यात आला आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.

कळंबोली येथील एम्.जी.एम्. रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल !

कळंबोली येथील एम्.जी.एम्. रुग्णालयात मृतदेह नातेवाइकांना देतांना मृतदेहांची आदलाबदल झाल्याने नातेवाइकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

लातूर येथे मुले पळवणारी टोळी सक्रीय असल्याची अफवा !

लहान मुले पळवून नेणारी टोळी जिल्ह्यात गावोगावी फिरत असल्याची अफवा पसरवली जात आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

कुठे ३५०० वर्षांत निर्माण झालेले विविध धर्म (पंथ), तर कुठे अनादि हिंदु धर्म !

. . . मग त्यापूर्वी या जगात कोण होते ? केवळ हिंदू होते. हिंदु धर्म हा अनादि आणि अनंत आहे आणि सर्वांचा मूळ धर्म हा हिंदूच आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

छगन भुजबळ यांनी सरस्वतीदेवीवर टीका केल्याचे प्रकरण ३ टक्के लोकांनीच सर्वांना शिकवले ! – महंत अनिकेतशास्त्री देशपांडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आक्षेपार्ह व्यक्त करून अज्ञान प्रकट केले आहे; कारण सावित्रीबाई फुले यांचा जो ‘काव्य फुले’ हा ग्रंथ आहे, त्यात ‘सावित्रीबाई फुले या स्वतः सरस्वतीदेवी आणि भगवान शंकर यांच्या पूजक आहेत’, असे जाणवते.

नागपूर येथे छगन भुजबळ यांच्या वक्तव्याच्या विरोधात भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन !

२ दिवसांपूर्वी भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात बोलतांना शाळेत होत असलेल्या सरस्वतीपूजनाच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते.

नायगाव (जिल्हा पालघर) येथील कारखान्यातील स्फोटात ३ कामगार ठार !

नायगाव पूर्व भागातील जुचंद्र वाकीपाडा येथील ‘कॉस पॉवर’ या कारखान्यात २८ सप्टेंबर या दिवशी दुपारी पावणेतीन वाजता बॉयलरचा स्फोट झाला. यात ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर ७ जण गंभीर घायाळ झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

अमरावती येथे पी.एफ्.आय.च्या जिल्हाध्यक्षाला अटक

या संघटनेचा अमरावती जिल्हाध्यक्ष सोहेल अन्वर याला अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने २७ सप्टेंबरच्या पहाटे ४ वाजता नागपुरी गेट क्षेत्रात अटक केली. पहाटे ५ वाजल्यापासून दुपारपर्यंत त्याची कसून चौकशी करण्यात आली.