कळंबोली येथील एम्.जी.एम्. रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल !

पनवेल – कळंबोली येथील एम्.जी.एम्. रुग्णालयात मृतदेह नातेवाइकांना देतांना मृतदेहांची आदलाबदल झाल्याने नातेवाइकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

दोन्ही मृतांच्या तोंडवळ्यामध्ये आणि आडनावात साम्य असल्याने हा प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे अंत्यदर्शनासाठी अलिबाग येथे घरी नेलेला मृतदेह पुन्हा रुग्णालयात आणून संबंधित नातेवाइकांना देण्यात आला.

मृतदेह घेऊन जातांना नातेवाइकांनी नीट ओळख पटवली नसल्याने मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे रुग्णालयाच्या प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अलिबाग येथील रमाकांत पाटील आणि पनवेल तालुक्यातील सोमाटणे येथील राम पाटील यांच्या मृतदेहांची अदलाबदल झाली होती.