सनातन संस्थेच्या वतीने कराड येथील ग्रंथप्रदर्शन कक्षाचा प्रारंभ !

कराड, २८ सप्टेंबर (वार्ता.) – नवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने श्री दैत्यनिवारणी मंदिर या ठिकाणी सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचा कक्ष लावण्यात आला आहे. ‘गोरक्षण बचाव समिती’चे अध्यक्ष श्री. सुनील पावसकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि श्रीफळ वाढवून या कक्षाचा प्रारंभ करण्यात आला.

श्री. सुनील पावसकर (टोपी आणि चष्मा घातलेले) यांना ‘सनातन पंचांग – २०२३’ भेट देतांना श्री. लक्ष्मण पवार आणि अन्य

हे प्रदर्शन ४ ऑक्टोबरअखेर प्रतिदिन सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत चालू असणार आहे. या प्रसंगी सनातनचे साधक श्री. लक्ष्मण पवार यांच्या हस्ते श्री. सुनील पावसकर यांना ‘सनातन पंचांग-२०२३’ भेट देण्यात आले.