नायगाव (जिल्हा पालघर) येथील कारखान्यातील स्फोटात ३ कामगार ठार !

७ जण घायाळ

ठाणे, २८ सप्टेंबर (वार्ता.) – नायगाव पूर्व भागातील जुचंद्र वाकीपाडा येथील ‘कॉस पॉवर’ या कारखान्यात २८ सप्टेंबर या दिवशी दुपारी पावणेतीन वाजता बॉयलरचा स्फोट झाला. यात ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर ७ जण गंभीर घायाळ झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. स्फोटाच्या आवाजामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्नीशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या प्रकरणी पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.