मंचकी निद्रेनंतर घटस्थापनेच्या दिवशी श्री तुळजाभवानीदेवी सिंहासनावर प्रतिष्ठापित !

घटस्थापनेच्या मध्यरात्री १ वाजता १७ सप्टेंबरपासून चालू झालेली श्री तुळजाभवानीदेवीची मंचकी निद्रा पूर्ण झाली. विधीवत् आणि परंपरागत पद्धतीने श्री तुळजाभवानीदेवीच्या भोपे पुजारी बांधवांनी देवीची मूर्ती पलंगावरून मुख्य सिंहासनावर प्रतिष्ठापित केली.

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ !

नवरात्र म्हणजे केवळ देवीचा आनंद उत्सव नसतो, तर स्वतःच्या आत्मिक शक्तीला जागे करण्याचे एक महत्त्वाचे पर्व होय. या अनुष्ठानाची पहिली पात्रता म्हणजे स्थिरता होय. ही स्थिरता येण्यासाठी आसनस्थ असणे आवश्यक आहे.

श्री महालक्ष्मी मंदिरातील सशुक्ल ‘ई-पास’ला कोल्हापूर येथील न्यायालयाने अनुमती नाकारली !

भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा विरोध असतांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने बळजोरीने नवरात्रोत्सव काळात २०० रुपये आकारून सशुक्ल ‘ई-पास’ देण्याचा निर्णय घेतला होता.

अमरावती येथील आमदार संतोष बांगर आक्रमणप्रकरणी ११ शिवसैनिकांना अटक !

२५ सप्टेंबर या दिवशी अंजनगाव सुर्जी येथे शिवसैनिकांच्या वतीने येथील शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या वाहनावर आक्रमण करण्यात आले होते. या प्रकरणी अंजनगाव पोलिसांनी ११ शिवसैनिकांना अटक केली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड विधान संहिता ३५३ सह विविध कलमांनुसार गुन्हा नोंद केला आहे.

अमेरिकेला सडेतोड !

भारताने अमेरिकेला सुनावणे, ही भारताच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढलेल्या शक्तीचे दर्शक ! पाक कधीही दिवाळखोर होण्याची शक्यता आहे. त्याच्यावर आता शेवटचा प्रहार करण्याची स्थिती निर्माण होत आहे. ही संधी भारताने साधावी आणि पाक नावाचा प्रश्न कायमचा सोडवावा !

भोर येथे ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍यांच्या विरोधात मोर्चा

मोर्चातील तरुणांनी भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांना भोर बस स्थानकाशेजारील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर वरील मागण्यांचे निवेदन दिले.

मिरज येथे ‘श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव मंडळा’चे विविध कार्यक्रम !

ब्राह्मणपुरीमधील इतिहासप्रसिद्ध पुरातन अशा श्री अंबाबाई मंदिरामध्ये २६ सप्टेंबरपासून ‘श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवा’ला प्रारंभ झाला. सकाळी ८ वाजता श्री. देशपांडे (चंदूरकर) यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अशांवर गुन्हा नोंदवून कारवाई करा !

बिहारच्या थावे शहरातील प्रसिद्ध श्री थावेमाता मंदिरात बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव चपला घालून गेल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

देवीची कृपा संपादन करूया !

कृतज्ञताभावाने व्यष्टी आणि समष्टी स्तरावर राष्ट्र अन् धर्म यांची सेवा करून आपल्या जन्मदात्या शक्तीला आपण कृतज्ञतारूपी पुष्प अर्पण करूया. छत्रपती शिवरायांनी स्वतःचे आयुष्य जगदंबेसाठी समर्पित केले, तो आदर्श ठेवून आपणही आई जगदंबेची सेवारूपी भक्ती करून नवरात्रीमध्ये तिची कृपा संपादन करूया !