नवरात्री नवरात्रोत्सव नवरात्री२०२२ देवी दुर्गादेवी दुर्गा देवी #नवरात्री #नवरात्रोत्सव #नवरात्री२०२२ #देवी #दुर्गादेवी Navaratri Navratri Navaratrotsav Navratrotsav Durgadevi Durga Devi Devi #Navaratri #Navratri #Navaratrotsav #Navratrotsav #Durgadevi #Durga #Devi
आई जेव्हा बाळाला जन्म देते, त्या आधी होणार्या सर्व प्रक्रियेत बाळाला गर्भामध्ये कोण घडवतो ? त्याला कोण शक्ती देतो ? याचा विचार केल्यास तेव्हापासूनच खर्या अर्थाने बाळ आणि त्याचे आई-वडील यांची शक्तीची उपासना चालू होते. आई-वडिलांचे विचार आणि संस्कार यांच्या रूपातील शक्ती बाळाला पुढे वहन करायची असते. ही इतकी दिव्य प्रक्रिया घडत असतांना आपल्या जन्मानंतर स्वतःचे आयुष्य जसजसे पुढे जाते, तसे आपल्याला या सर्वांचा विसर पडतो. ही एक प्रकारची कृतघ्नताच नव्हे का ? ज्या तेजोमय शक्तीने आपल्याला आयुष्यरूपी वरदान दिले, तिलाच आपण काही कालावधीनंतर विसरून जातो. हे वरदान आपल्याकडून राष्ट्र, धर्म आणि गुरु यांची सेवा घडावी, यासाठी दिले आहे; पण सध्याच्या तरुण पिढीला याचा विसर पडला आहे, असे लक्षात येते.
आता नवरात्र चालू झाले. या कालावधीत शक्तीची उपासना करण्याऐवजी मोठमोठ्या ध्वनीक्षेपकाच्या भिंती उभारण्याची स्पर्धाच जणू मंडळा-मंडळांमध्ये पहायला मिळते आणि असंख्य अशा तरुणाईची शक्ती ही नाचगाण्यामध्ये वाया जात आहे. नवरात्रीत गरबा हा देवीची उपासना करण्याचा भाग असतो. असे असतांना देवीच्या भक्तीत लीन होऊन गरबा करणारा एक तरी युवक-युवती आपल्याला दिसते का ? सण हे मनोरंजनाचे साधन नसून उपासनेचे माध्यम आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
सद्यःस्थितीत राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती पहाता सध्याच्या तरुण पिढीने नैतिक दायित्व ओळखून भानावर आले पाहिजे. आपण एकीकडे देवीची पूजा करतो; पण दुसरीकडे आपल्याच समाजातील आई-बहिणींवर होणारी आक्रमणे थांबवण्यासाठी आपण असमर्थ ठरतो. ही आक्रमणे रोखण्यासाठी कृती करणे, हे आपले दायित्व नव्हे का ? ज्या शक्तीमुळे आपण आहोत, तिचे पावित्र्य जपणे, हे आपले कर्तव्य नव्हे का ? या सर्वांचा सारासार विचार सर्वांकडूनच व्हायला हवा. या नवरात्रीत कृतज्ञताभावाने व्यष्टी आणि समष्टी स्तरावर राष्ट्र अन् धर्म यांची सेवा करून आपल्या जन्मदात्या शक्तीला आपण कृतज्ञतारूपी पुष्प अर्पण करूया. ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी स्वतःचे आयुष्य जगदंबेसाठी समर्पित केले, तो आदर्श ठेवून आपणही आई जगदंबेची सेवारूपी भक्ती करून नवरात्रीमध्ये तिची कृपा संपादन करूया !
– श्री. जयेश बोरसे, पुणे