भारतीय कृषी परंपरेचे महत्त्व आणि या परंपरेला टिकवून ठेवण्याची आवश्यकता
पुरातन भारतीय कृषी परंपरा ही निसर्गाला अनुकूल होती. स्थानिक परिस्थितीशी सुसंगत अशा देशी बियाण्यांचा उपयोग करणे, मातीचे स्वास्थ्य टिकवून ठेवणे आणि शेतातील जिवाणू, कीटक, तसेच पिके यांची जैवविविधता (बायोडायव्हर्सिटी) राखणे अशा भक्कम पायावर ही व्यवस्था उभी होती.