हिंदूंच्या श्रद्धा, देशाचे सार्वभौमत्व आणि विचारस्वातंत्र्य यांवर होत आहे ‘जिहादी’ आक्रमण !

नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्यासंदर्भात केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानानंतर भारतभरात ‘सर तन से जुदा’ (शीर धडापासून वेगळे करणे) नावाचे अभियान हाती घेण्यात आले. हिंदूंच्या जिवावर उठलेल्या या भयावह अभियानाच्या क्रियेला प्रतिक्रिया दिली जाईल, असे हिंदूंच्या अतीसहिष्णु वृत्तीच्या इतिहासातून वाटत नाही. तरीही या हिंसात्मक घटनांचा मागोवा घेणे मात्र आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर या संपूर्ण घटनाक्रमावर प्रकाश टाकणारा पाक्षिक ‘हिंदु विश्व’मध्ये प्रकाशित झालेला लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रसिद्ध करत आहोत. 

(पूर्वार्ध)

१. जिहादी मारेकर्‍यांना राजाश्रय मिळाल्याने निरपराध हिंदूंच्या हत्या होणे ?

‘२१ जून २०२२ या दिवशी अमरावतीमध्ये (महाराष्ट्र) औषध व्यावसायिक उमेश कोल्हे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. महाराष्ट्र पोलिसांनी त्याला सामान्य हत्येचे प्रकरण समजून अन्वेषण चालू केले. त्यानंतर ७ दिवसांनी  (२८ जून या दिवशी) राजस्थानच्या उदयपूरमध्ये अशाच प्रकारची घटना घडली. तेथे धर्मांधांनी कन्हैयालाल या शिवणकाम करणार्‍याची २६ वार करून हत्या केली. कन्हैयालालवर भाजपच्या तत्कालीन प्रवक्त्या नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्याचा संशय होता. धर्मांधांनी कन्हैयाची हत्या करतांनाचे ध्वनिचित्रीकरणही प्रसारित केले. यावरून इस्लामच्या नावावर जिहादी आक्रमण केल्याचे स्पष्ट झाले.

‘देशातील ही दोन्ही आक्रमणे राजाश्रय मिळाल्यामुळे झाली आहेत’, असे वाटते. अमरावतीत उमेश कोल्हे यांची हत्या झाली, तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेस अणि राष्ट्रवादी यांच्या पाठिंब्याचे सरकार होते. महाराष्ट्रात भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांचे सरकार येताच या घटनेचे खरे स्वरूप उघड झाले. उमेश कोल्हे यांचीही हत्या ‘सर तन से जुदा’मुळे झाली आहे, हे देशाला समजले. अशा प्रकारची निर्घृण हत्या आतापर्यंत केवळ ‘इसिस’सारखी आतंकवादी संघटनाच करत आली आहे.

राजस्थानमध्ये काँग्रेसची राजवट आहे. उदयपूरमधील कन्हैयालालच्या निर्घृण हत्येनंतर देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. कन्हैयालाल याला जिवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या आणि त्याने पोलिसांकडे सुरक्षाही मागितली होती. हे कळल्यावर देशवासियांचा रोष अधिकच वाढला. पोलिसांनी त्याला सुरक्षा देण्याऐवजी धार्मिक भावना भडकावल्याच्या आरोपाखाली त्यालाच अटक केली. जामिनावर सुटका झाल्यावर त्याला धमक्या मिळायला लागल्या होत्या, तरीही पोलिसांनी काहीच हालचाल केली नाही.

२. राजस्थान पोलिसांवरही हत्येचा खटला चालणे आवश्यक !

उदयपूर पोलिसांनी कन्हैयालाल याला ठार मारण्याच्या धमक्या गांभीर्याने घेतल्या नाहीत. त्यांनी त्याचे गांभीर्याने अन्वेषण केले असते, तर आतंकवाद्यांचे षड्यंत्र आधीच उघड झाले असते. मतपेटीच्या राजकारणाने मात्र तसे होऊ दिले नाही. यात ज्या राजस्थान पोलिसांनी निष्काळजीपणा केला, त्यांच्यावर हत्येचे षड्यंत्र केल्याच्या आरोपाखाली खटला का भरला जाऊ नये ? एवढेच नाही, तर पोलिसांना निष्क्रीय करणार्‍या नेत्यांचीही चौकशी होऊन त्यांच्यावरही खटला चालणे आवश्यक आहे.

उदयपूर आणि अमरावती येथील जिहादी मारेकर्‍यांनी स्पष्ट केले की, ही हिंदूंच्या धर्मश्रद्धांवरील आक्रमणे आहेत. उदयपूरच्या मारेकर्‍यांनी ज्या प्रकारे पंतप्रधान मोदी यांना धमकी दिली, त्यावरून हे स्पष्ट होते की, हे देशाच्या सार्वभौमत्वावर थेट आक्रमण आहे, तसेच ते विचारस्वातंत्र्यावरही आक्रमण आहे.

३. ‘सर तन से जुदा..’च्या घोषणा देणारे आणि ती करणार्‍यांना बक्षीस देणारे यांच्यावर पोलीस खटला चालवतील का ?

आपल्याला एखाद्याची गोष्ट पटली नाही, तर त्याचा गळा कापायचा का ? भारत शरीयानुसार नाही, तर राज्यघटनेनुसार चालतो. राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्तीस्वातंत्र्य मिळाले आहे. नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर अनेक शहरांमध्ये गुन्हे नोंद झाले. त्यांच्यावर निश्चित कायदेशीर कारवाई होईल; परंतु त्यांना जिवे ठार मारण्याच्या धमक्यांचे सत्र चालूच आहे. आजही नूपुर शर्मा यांचा गळा आणि जीभ कापणार्‍यांना बक्षीस देण्याच्या घोषणा करण्यात येत आहेत. मग पोलीस यंत्रणा ‘सर तन से जुदा..’च्या घोषणा करणारे आणि बक्षिसांचे प्रलोभन देणारे यांच्यावर कन्हैयालाल अन् उमेश कोल्हे यांच्या हत्येचा खटला चालवणार आहेत का ?

४. आतंकवादी आक्रमणे इस्लामी कृत्ये आहेत कि नाहीत ?

काही इस्लामी धर्मगुरु या गोष्टींच्या विरोधात असल्याचे सांगतात. ते म्हणतात, ‘‘देशाच्या कायद्यानुसार मारेकर्‍यांवर कारवाई झाली पाहिजे.’’ सर्व मारेकर्‍यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे; परंतु मोठा प्रश्न हा आहे की, या निर्घृण हत्या इस्लामी कृत्ये आहेत का ? जर ही इस्लामी कृत्ये नसतील, तर मग इस्लाममध्ये काफिर, जिहाद, माल-ए-गनीमत (शत्रूला पराजित केल्यावर त्याच्या मालमत्तेवर नियंत्रण मिळवण्याची प्रक्रिया), ‘अल्-तकिया’ यांसारख्या शब्दांची व्याख्या काय आहे ? हेही त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. ‘अल्-तकिया’ या संकल्पेनुसार इस्लामच्या प्रचारार्थ अथवा स्वत:चा बचाव करण्यासाठी खोटे बोलणे, धोका देणे आदी कृत्ये ही धर्मसंमत आहेत.

५. मूठभर धर्मांधांनी हिंदु समाजाला घाबरवणे शक्य नाही !

उदयपूरमध्ये ज्या पद्धतीने हत्येची चित्रफीत बनवून प्रसारित करण्यात आली, त्यावरून हे स्पष्ट झाले की, ‘कन्हैयालालच्या हत्येचा मुख्य उद्देश संपूर्ण सनातन (हिंदु) समाजाला घाबरवणे’, हा आहे. अमरावतीतही ज्यांनी नूपुर शर्माच्या समर्थनार्थ काहीतरी ‘पोस्ट’ केले होते, त्या सर्वांना धर्मांधांनी ठार मारण्याच्या धमक्या दिल्या आणि क्षमायाचनेची ध्वनिचित्रफीत सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यास सांगितले होते. अशाने मूठभर धर्मांध संपूर्ण सनातन समाजाला घाबरवण्यास यशस्वी होतील का ? हा प्रश्न आहे आणि हे कधीच शक्य होणार नाही.

पूर्वी इ.स. ७१३ मध्ये महंमद बिन कासिम याने भारतात प्रवेश करून मोठ्या प्रमाणात लूटमार करून हिंदूंना तलवारीच्या जोरावर मुसलमान होण्यासाठी भाग पाडले होते. ज्यांनी धर्मांतर केले नाही, त्यांना ठार करण्यात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत अनुमाने १२ कोटी हिंदूंची हत्या करण्यात आली. तरीही हिंदूंची सनातन संस्कृती मान ताठ करून उभी आहे.

– रवि पाराशर

(साभार : पाक्षिक ‘हिंदु विश्व’)