अल्पवयीन मुलीवर अनेक वेळा बलात्कार करणार्‍या ख्रिस्ती पाद्र्याला जन्मठेप !

जर एखाद्या साधूवर असे खोटे आरोप जरी झाले असते, तर एव्हाना निधर्मीवाद्यांनी हिंदु धर्मावरच चिखलफेक करण्यास आरंभ केला असता ! प्रसारमाध्यमांनी आकाशपाताळ एक करून हिंदु संतांवर टीका केली असती ! आता शिक्षा करण्यात आलेला ख्रिस्ती पाद्री असल्याने सर्वत्र शांतता आहे.

सोनाली फोगाट यांना २ वेळा अमली पदार्थ देण्यात आल्याची त्यांच्या स्वीय साहाय्यकाची कबुली !

पोलिसांनी या प्रकरणी कसून अन्वेषण केल्यानंतर आरोपींनी सोनाली फोगाट यांना अमली पदार्थ दिल्याचे कबूल केले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, या प्रकरणाचे अन्वेषण पोलीस योग्य दिशेने करत आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल…

आमदार टी. राजासिंह यांना तात्काळ सशस्त्र संरक्षण पुरवावे !

अशी मागणी का करावी लागते ? टी. राजा सिंह यांच्या जिवाला धोका असल्याने सरकार त्यांना कारागृहात सुरक्षा का पुरवत नाही ?

उद्दाम टॅक्सी चालकांविरोधात भ्रमणभाषच्या माध्यमातून तक्रार करता येणार !

प्रवाशांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ या कालावधीत संपर्क साधून किंवा व्हॉट्सअपवर संदेश पाठवून, तसेच केवळ लघुसंदेश पाठवूनही पुराव्यासह तक्रार करता येणार आहे.

अन्य गणेश मंडळांना विसर्जनासाठी पुण्यातील लक्ष्मी रस्त्याचा वापर करण्यावर असलेली बंधने अवैध ! – बढाई समाज ट्रस्ट

विसर्जन मिरवणुकीच्या वेळी लक्ष्मी रस्त्यावरून प्रथम मानाची ५ गणेश मंडळे गेल्यानंतरच अन्य मंडळांनी मार्गस्थ व्हावे, हा रूढी-परंपरा आणि प्रथेचा भाग, म्हणजे कायदा नाही.

बंगालमधील हिंदूंसारखी स्थिती अन्य राज्यांत होऊ नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहावे ! – प्रकाश दास, अध्यक्ष, ‘पश्चिम बंगेर जन्य’

हिंदु जनजागृती समिती आयोजित विशेष संवाद :  ‘बंगालच्या हिंदूंची वर्तमान स्थिती !’

मुंबई ‘मेट्रो-३’ची आरेच्या सारीपूतनगर येथे ट्रॅकवर चाचणी

मुंबई ‘मेट्रो-३’च्या कारशेडवरून सध्या मोठा वाद चालू आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने रहित केलेल्या आरे कारशेडला सध्याच्या युतीच्या सरकारने संमती दिली. त्यानंतर आरेमध्ये कारशेड होऊ नये यासाठी पर्यावरणवादी आक्रमक झाले आहेत.

पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची ५ कोटी ८७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा नोंद

गोयल यांनी पुणे महानगरपालिकेकडे वाढीव चटई क्षेत्र खरेदीसाठी अर्ज केला होता. अर्ज संमत झाल्यानंतर आरोपींनी महानगरपालिकेत जाऊन दिशाभूल करणारी माहिती देऊन हरकत घेतली.

हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांमागे असलेल्या जिहादी वृत्तीच्या गुन्हेगारांना तात्काळ अटक करा !

देशात अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या झालेल्या हत्यांसाठी जिहादी मानसिकता असलेलेल्या धर्मांधच कारणीभूत आहेत. अशा वृत्तीच्या गुन्हेगारांना तात्काळ अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. बापू ठाणगे यांनी येथे केले.

कोरोनाचे मळभ दूर सारत श्री गणेशाचे उत्साही वातावरणात आगमन !

२ वर्षे कोरोनाच्या सावटाखाली गेल्यानंतर यंदा अत्यंत उत्साही, भक्तीमय वातावरणात श्री गणेशाचे सर्वत्र आगमन झाले. राज्यात सर्वत्र घरगुती, तसेच सार्वजनिक ठिकाणी ‘गणपति बाप्पा मोरया’च्या गजरात श्री गणेशाची स्थापना करण्यात आली.