‘स्वच्छ आणि सुंदर शहर’ म्हणून मिरवणार्‍या सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय कार्यालय अस्वच्छ !

येथील प्रशासकीय कार्यालयात काही ठिकाणी वातानुकूलित यंत्रांमधून पाणी खाली सांडणे, काही ठिकाणी पाणी साचून रहाणे, यंत्रातील पाणी तेथील भिंतीवर पडून भिंत खराब होणे

संत आसाराम बापू यांची कारागृहातून त्वरित सुटका करावी !

सोलापूर येथे श्री योग वेदांत समितीची ‘मूक मोर्चा’द्वारे मागणी

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी अपसमजातून ‘हलाल’विषयी वक्तव्य केले ! – यशवंत किल्लेदार, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेना

‘हलाल’च्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढा उभा करणार असून मनसे ‘नो टू हलाल’ ही मोहीम हाती घेणार आहे’, अशी घोषणा २७ ऑगस्ट या दिवशी श्री. यशवंत किल्लेदार यांनी पत्रकार परिषदेत केली होती;..

बेळगाव सीमावाद प्रश्नाची सर्वाेच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर; पुढील सुनावणी नोव्हेंबरमध्ये

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने वर्ष २००४ मध्ये सर्वाेच्च न्यायालयात दावा प्रविष्ट केला आहे. या दाव्यानुसार ८६५ गावावर आपला अधिकार सांगितला आहे.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील आयकर विभागाच्या कारवाईत बेहिशेबी रोकड, सोने आणि मालमत्ता आढळली नाही !

२५ ऑगस्टपासून आयकर विभागाकडून साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि ‘डीव्हीपी’ उद्योग समुहाचे सर्वेसर्वा अभिजित पाटील यांचे कार्यालय आणि कारखाना यांवर ही कारवाई चालू होती.

पुणे येथील चांदणी चौकातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी जुना उड्डाणपूल पाडणार !

कोथरूड परिसरातील चांदणी चौकातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी एन्.डी.ए.-मुळशी रस्त्यावरील उड्डाणपूल पाडून तेथे नवा पूल उभारण्यात येणार आहे. हा जुना उड्डाणपुल १२ ते १५ सप्टेंबर या कालावधीत पाडला जाणार आहे.

वांद्रे येथे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ५२ फुटी पशुपतिनाथ मंदिराची प्रतिकृती

प्रतिवर्षी प्रसिद्ध मंदिरांची हुबेहुब आरास साकारणार्‍या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा नेपाळ देशातील काठमांडू येथील प्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराची ५२ फूट उंच हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा आमदार आशिष शेलार हे या मंडळाचे प्रमुख सल्लागार आहेत.

सुट्या दुधाच्या किंमतीत वाढ !

अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ केल्यानंतर मुंबईत १ सप्टेंबरपासून सुट्या (खुले) दुधाच्या किमतीत ५ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुंबई दूध उत्पादक महासंघाने घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता १ लिटर दुधासाठी ८० रुपये द्यावे लागणार आहेत.

गोव्यात विक्रीसाठी असणार्‍या मद्याच्या अवैध वाहतुकीवर धाड : सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेर्ले गावच्या सीमीत ही कारवाई केली. या प्रकरणी श्रीकृष्ण कदम याला अटक करण्यात आली असून स्विफ्ट ही चारचाकी गाडीही जप्त केली आहे.

अवैध बांधकामास चाप !

अवैध बांधकामांना चाप लागण्यासाठी त्याच्याशी संबंधित प्रत्येकावर कालमर्यादेत कठोर कारवाई आवश्यक !