कोरोनाचे मळभ दूर सारत श्री गणेशाचे उत्साही वातावरणात आगमन !

मुंबई  – २ वर्षे कोरोनाच्या सावटाखाली गेल्यानंतर यंदा अत्यंत उत्साही, भक्तीमय वातावरणात श्री गणेशाचे सर्वत्र आगमन झाले. राज्यात सर्वत्र घरगुती, तसेच सार्वजनिक ठिकाणी ‘गणपति बाप्पा मोरया’च्या गजरात श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवामुळे सर्वत्र मांगल्य, पावित्र्य, तसेच चैतन्यमय वातावरण निर्माण झाले झाले आहे.