आमदार टी. राजासिंह यांना तात्काळ सशस्त्र संरक्षण पुरवावे !

तेलंगाणातील हिंदु संघटनांची मागणी

टी. राजासिंह

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील गोशामहलचे आमदारटी. राजा सिंह यांना तात्काळ सशस्त्र संरक्षण देण्यात यावे आणि त्यांना ठार मारण्याची धमकी देणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सरकारकडे केली आहे. या संदर्भात भाग्यनगर आणि रंगा रेड्डी या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. या वेळी राष्ट्रीय शिवाजी सेना, धर्मवीर संस्था, बजरंग सेना, श्रीराम युवा सेना, विहिंप, धर्मारक्षा श्रीराम सेना, श्रीरामराज्य वेदिका आदी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

राजा सिंह यांचे घर जाळण्याची धमकी देणारे काँग्रेसचे सचिव राशिद खान, रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकांची हत्या करण्यासाठी मुसलमानांना चिथावणी देणारा कलीमुद्दीन, मुसलमानांना भडकावणारा काँग्रेसचा नेता फिरोज खान आदींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच तेलंगाणा सरकारकडून राजा सिंह यांना न्याय मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांच्यावरील खटले महाराष्ट्र, कर्नाटक किंवा गोवा राज्यांत हस्तांतरित करण्यात यावेत. ज्या कारागृहात राजा सिंह यांना ठेवण्यात आले आहे, तेथे आधीपासून जिहादी आतंकवादीही अटकेत आहेत. त्यंच्यामुळे राजा सिंह यांच्या जिवाला धोका असल्याने त्यांना योग्य सुरक्षा देण्यात यावी, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ? टी. राजा सिंह यांच्या जिवाला धोका असल्याने सरकार त्यांना कारागृहात सुरक्षा का पुरवत नाही ?