बेळगाव येथे नोंदणीकृत वृत्तपत्रे आणि माध्यमे यांच्या पत्रकारांनाच ओळखपत्र देण्यात येणार ! – जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांची बैठक घेऊन त्यांना  माहिती देतांना जिल्हाधिकारी नितेश पाटील

बेळगाव – खोट्या पत्रकारांमुळे अधिकारी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता नोंदणीकृत वृत्तपत्रे आणि माध्यमे यांच्या पत्रकारांनाच ओळखपत्र देण्यात येणार आहेत. कोणतेही विनापरवाना वृत्तपत्र, यू ट्यूब, ‘वेबसाईट-बेवपोर्टल’ यांमध्ये काम करणार्‍या पत्रकाराला ओळखपत्र दिले जाणार नाही, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांची बैठक घेऊन त्यांनी ही माहिती दिली.

या प्रसंगी पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील म्हणाले, ‘‘काही वाहनांवर ‘प्रेस’ म्हणून लिहिले आहे. प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करणारे, तसेच कपड्यांना इस्त्री करून देणारेही दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर प्रेस म्हणून लिहितात; मात्र आता यापुढे काटेकोर पडताळणी केली जाईल. ज्यांच्याकडे ओळखपत्र आहे, त्यांनाच ही मुभा दिली जाणार आहे.’’