बंगलो आणि फार्महाऊस यांसाठी प्लॉट देण्याच्या उद्देशाने ४५० गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक !

प्रतीकात्मक छायाचित्र

पुणे – बंगलो आणि फार्म हाऊस यांसाठी प्लॉट देण्याच्या उद्देशाने ४५० गुंतवणुकदारांच्या ‘साईरंग डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. त्यामुळे या आस्थापनाच्या संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश एस्.जे. भरूका यांनी हा आदेश दिला. के.आर्. मलिक (वय ५६ वर्षे) असे जामीन फेटाळण्यात आलेल्या संचालकाचे नाव आहे. संचालकांसमवेतच शाहरुख मलिक, कार्यकारी संचालक नंदिनी कोंढाळकर आणि अन्य यांच्यावर गुन्हे नोंद केले आहेत. २० एकर भूमीची मालकी असतांना मलिक यांनी ३०० एकर जागा विकसित करणार असल्याचे दाखवले आहे, असे अन्वेषणात समोर आले आहे.