चेन्नई (तमिळनाडू) येथे ‘हिंदु इळैंगर येळूच्ची पेरवई (हिंदु युवा जागरूकता महासंघ)’ संघटनेने केले धर्मांतरविरोधी निषेध आंदोलन !

श्री. पाला संतोष

चेन्नई (तमिळनाडू) – कोईंबतूर येथील ‘करुणाइपलम’ या स्वयंसेवी संस्थेने अनुमाने ३०० भिकार्‍यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केली आणि त्यांचे बळजोरीने धर्मांतर केले. या धर्मांतराच्या विरोधात ‘हिंदु इळैंगर येळूच्ची पेरवई’ या संघटनेने येथील सैदापेट येथे निषेध आंदोलन केले. या आंदोलनात अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते, तसेच या आंदोलनात ‘हिंदु द्रविड कळघम’ (हिंदु द्रविड संघ) संघटनेचे श्री. रमेश बाबू आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. बालाजे कोल्ला सहभागी झाले होते. या आंदोलनाचे १६ स्थानिक ‘यू ट्यूब चॅनेल’ने थेट प्रक्षेपण केले.

या आंदोलनाच्या वेळी ‘हिंदु इळैंगर येळूच्ची पेरवई’चे संस्थापक श्री. पाला संतोष म्हणाले, ‘‘या पुढे ख्रिस्ती स्वयंसेवी संस्थांनी बळजोरीने धर्मांतर केले आणि हिंदु देवतांची विटंबना केली, तर हिंदू ते सहन करणार नाहीत. आम्ही त्यांना वैध मार्गाने प्रत्युत्तर देऊ.’’