केदार दिघे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज संमत !

केदार दिघे

मुंबई – शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने संमत केला आहे. दिघे यांच्याविरुद्ध बलात्कार पीडितेला धमकावल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. ‘दिघे यांनी पोलीस चौकशीत सहकार्य करावे’, अशी अट न्यायालयाने जामीन देतांना घातली आहे. दिघे यांचा मित्र रोहित कपूर याने २८ जुलै या दिवशी २३ वर्षीय महिलेवर एका हॉटेलमध्ये बलात्कार केला होता. या प्रकरणात दिघे यांनी त्या महिलेला पैसे घेऊन गप्प रहाण्यास सांगितले; मात्र पीडितेने याला नकार दिल्यानंतर ‘त्यांनी तिला जिवे मारण्याची धमकी दिली’, असा दिघे यांच्यावर आरोप आहे.