३३ मासांत एकही विद्यार्थी वर्गात न आल्याने प्राध्यापकाने परत केले पगाराचे अनुमाने २४ लाख रुपये !

नितिशेश्‍वर महाविद्यालयातील साहाय्यक प्राध्यापक लालन कुमार यांनी गेल्या ३३ मासांत एकही विद्यार्थी त्यांच्या वर्गात न आल्यामुळे ते कुणालाच शिकवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी ३३ मासांतील त्यांचा संपूर्ण पगार परत केला आहे.

एकटी मुसलमान महिला अल्पवयीन मुलांची पालक होऊ शकत नाही ! – केरळ उच्च न्यायालय

केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणात निर्णय देतांना एकटी मुसलमान महिला तिचे अल्पवयीन मूल आणि तिची संपत्ती यांची पालक होऊ शकत नाही; कारण यापूर्वीच अशा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिले आहेत.

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते आणि त्यांचे २ साथीदार यांची हत्या !

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याने त्या पक्षाचे नेतेही असुरक्षित आहेत !

हेरगिरीच्या आरोपावरून इराणमधील ब्रिटनच्या उप राजदूतांची हकालपट्टी !

क्षेपणास्त्रांच्या परीक्षणाच्या वेळी निषिद्ध क्षेत्रात येऊन हेरगिरी केल्याच्या प्रकरणी ‘इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स’ने ब्रिटनचे उप राजदूत जाईल्स व्हिटेकर आणि अन्य काही जणांना अटक केली.

श्रीलंकेतील ६० लाख लोकांना भेडसावत आहे अन्न असुरक्षितता !

श्रीलंकेतील १० पैकी ३ कुटुंबांना ‘आमच्या पुढील भोजनाची व्यवस्था  कुठून केली जाईल’, याविषयी अनिश्‍चित असतात. सुमारे ६० लाख नागरिकांना भोजनाची व्यवस्था करणे कठीण जात आहे.

केरळमध्ये येशू ख्रिस्ताविषयी अपमानास्पद टिप्पणी करणार्‍या मौलवीच्या विरोधात गुन्हा नोंद

साम्यवाद्यांच्या राज्यात ख्रिस्ती किंवा मुसलमान यांच्या धार्मिक भावना दुखावल्यावर तेथील पोलीस तात्काळ त्याची नोंद घेतात; मात्र हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावर वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करतात, हे लक्षात घ्या !

म्यानमारमध्ये दोन तमिळ तरुणांची गोळ्या झाडून हत्या

मणीपूर राज्यातील मोरेह शहरातून म्यानमार देशातील तामू शहरामध्ये गेलेल्या पी. मोह आणि एम्. अय्यरनार या दोन तरुणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या डोक्यात अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या.

नूपुर शर्मा यांची जीभ कापणार्‍यांना २ कोटी रुपये देण्याची कट्टरतावादी मुसलमानाची घोषणा !

भारतातील कट्टरतावादी मुसलमानांना कायद्याचे भय राहिले नसल्याचेच हे उदाहरण आहे. देशातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार्‍या अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे !

दंडाधिकारी न्यायालयांनी केवळ टपाल कार्यालय म्हणून काम करू नये ! – केरळ उच्च न्यायालयाने फटकारले

फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६ (३) अंतर्गत असलेल्या अधिकाराचा वापर करतांना दंडाधिकारी न्यायालयांनी केवळ टपाल कार्यालय  म्हणून काम करू नये. तसेच कोणती तक्रार आल्यास ती विचारपूर्वक वाचावी.

निझामाबाद (तेलंगाणा) येथे जिहादी आतंकवादी संघटना ‘पी.एफ्.आय.’कडून कराटे प्रशिक्षणाच्या नावाखाली मुसलमानांना शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण !

हिंदूंना लक्ष्य करण्याचे प्रशिक्षण !
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या ३ नेत्यांना अटक