म्यानमारमध्ये दोन तमिळ तरुणांची गोळ्या झाडून हत्या

पी. मोह आणि एम्. अय्यरनार

इंफाळ (मणीपूर) – मणीपूर राज्यातील मोरेह शहरातून म्यानमार देशातील तामू शहरामध्ये गेलेल्या पी. मोह आणि एम्. अय्यरनार या दोन तरुणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या डोक्यात अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या. ‘मोरेह तमिळ संगम’ या संघटने सचिव के.बी.एम् मनियम यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही एका तामिळ मित्राला भेटायला गेले होते. मोरेह हे मणीपूरमधील भारत-म्यानमार सीमेवर वसलेले शहर आहे. मोरेहमध्ये दोघांच्या मृत्यूच्या बातमीनंतर उत्स्फूर्त ‘बंद’ पाळण्यात आला. मोरेह शहरात मेइटीस, कुकी, तमिळ, पंजाबी आणि इतर लोक रहातात. येथे तमिळ लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे.

१. आतापर्यंत आमच्याकडे ‘या दोघांची हत्या का आणि कुणी केली ?, याचा कोणताही तपशील नाही; परंतु त्यांचे मृतदेह परत आणण्यासाठी उच्च स्तरावर चर्चा चालू आहे’, असे मोरेह येथील पोलीस अधिकारी आनंद यांनी सांगितले.

२. मनियम यांनी आरोप केला आहे की, या दोघांना म्यानमार सैन्याने सिद्ध केलेल्या ‘प्यू शॉ हेटी’ या संघटनाने गोळ्या घातल्या आहेत. आम्हाला सीमेपलीकडील लोकांकडून कळले आहे की, दोन व्यक्तींना प्यू शॉ हेटीने थांबवले आणि गोळ्या घातल्या.