नूपुर शर्मा यांची जीभ कापणार्‍यांना २ कोटी रुपये देण्याची कट्टरतावादी मुसलमानाची घोषणा !

भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा (उजवीकडे )

मेवात (हरियाणा) – येथील एका कट्टरतावादी मुसलमानाने भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांची जीभ कापणार्‍या २ कोटी रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे. एका पत्रकाराला मुलाखत देतांना या कट्टरतावादी मुसलमानाने हे चिथावणीखोर विधान केले असून त्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. त्यानंतर संबंधित कट्टरतावादी मुसलमान पत्रकारालाच ‘तू  नूपुर शर्मा यांची जीभ का कापत नाहीस ? माझ्या आवाहनाला तू प्रतिसाद का देत नाहीस ?’, असे ओरडून सांगतांनाही दिसत आहे. हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर पोलीस घटनेचे अन्वेषण करत आहेत. या कट्टरतावाद्याचे नाव अजून समोर आलेले नाही.

संपादकीय भूमिका

भारतातील कट्टरतावादी मुसलमानांना कायद्याचे भय राहिले नसल्याचेच हे उदाहरण आहे. देशातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार्‍या अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे !