हेरगिरीच्या आरोपावरून इराणमधील ब्रिटनच्या उप राजदूतांची हकालपट्टी !

डावीकडे ब्रिटनचे उप राजदूत जाईल्स व्हिटेकर

तेहरान (इराण) – क्षेपणास्त्रांच्या परीक्षणाच्या वेळी निषिद्ध क्षेत्रात येऊन हेरगिरी केल्याच्या प्रकरणी ‘इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स’ने ब्रिटनचे उप राजदूत जाईल्स व्हिटेकर आणि अन्य काही जणांना अटक केली. या संदर्भातील व्हिडिओही प्रसारित करण्यात आला आहे. या प्रकरणी व्हिटेकर यांनी क्षमा मागितल्यानंतर त्यांना इराणमधून हाकलून देण्यात आले आहे.