बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते आणि त्यांचे २ साथीदार यांची हत्या !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

कोलकाता – बंगालमधील २४ परगणा जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसचे नेते आणि त्यांचे २ साथीदार यांची अज्ञातांनी हत्या केली. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि पंचायत समिती सदस्य स्वपन माझी हे त्यांच्या २ साथीदारांसह दुचाकीवरून जात होते. तितक्यात काही लोक तिथे आले. त्यांनी स्वपन यांची दुचाकी थांबवली आणि तिघांवर अंदाधुंद गोळीबार केला. यानंतर आक्रमणकर्ते घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी साधारण ९ वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.

संपादकीय भूमिका

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याने त्या पक्षाचे नेतेही असुरक्षित आहेत ! ‘जेथे सत्ताधारी पक्षाचे नेतेच असुरक्षित असतील, तेथे सामान्य जनता कशी जगत असेल ?’, याचा विचारही न केलेला बरा !