ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांना ‘ब्राह्मणभूषण’ पुरस्कार घोषित !

‘आम्ही सारे ब्राह्मण’ आणि ‘ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका’ या दोन्ही नियतकालिकांच्या वतीने देण्यात येणारा ‘ब्राह्मणभूषण’ पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रसार करणारे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांना घोषित करण्यात आला आहे.

मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी सचिन वाझे यांनी प्रदीप शर्मा यांना दिले ४५ लाख रुपये !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचा प्रतिज्ञापत्रात गंभीर आरोप !

नालासोपारा येथील वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका दीड घंटा अडकली !

येथे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. ३ मे या दिवशी येथील उड्डाणपुलावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने एक रुग्णवाहिका त्यातच जवळजवळ १ ते दीड घंटा अडकून पडली.

सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात मतदान होणे शक्य नाही ! – राज्य निवडणूक आयोग

निवडणूक कार्यक्रमाची सविस्तर माहिती देतांना किरण कुरुंदकर म्हणाले, ‘‘प्रभाग रचना, आरक्षण सोडत, मतदान सूची करणे आणि निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा अशा ४ टप्प्यांत निवडणूक होते.

बंदीवानाच्या पत्नीकडून २ जिवंत काडतुसांसह गावठी पिस्तूल जप्त !

हा प्रकार वेळीच लक्षात आला नसता, तर अनर्थच घडला असता ! कारागृह प्रशासनाने या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगायला हवी !

राज ठाकरे यांनी खरी मर्दानगी दाखवली ! – कालीचरण महाराज

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरी मर्दानगी दाखवली आहे. भोंग्यांविषयीची राज ठाकरे यांची भूमिका योग्य असून त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे, असे मत कालीचरण महाराज यांनी व्यक्त केले.

नागपूर येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या २ भोंदूबाबांना अटक !

१७ वर्षांच्या मुलीवर अंगारे-धुपारे देऊन पूजा करण्याच्या नावाखाली ३ मे या दिवशी सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी २ भोंदूबाबांना पोलिसांनी अटक केली आहे. मनोहर कोल्हे आणि युवराज सोनटक्के अशी त्यांची नावे आहेत.

नगर जिल्ह्यात २ सहस्र अनधिकृत भोंगे !

नगर येथील अजान भोंग्याविना ! श्रीरामपूरमधील सय्यदबाबा चौकातील मशिदीसमोर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामूहिक हनुमान चालिसाचे पठण करणार्‍या मनसे कार्यकर्त्यांना श्रीरामपूर पोलिसांनी अटक केली.

जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीचे ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले !

‘सामर्थ्य आहे चळवळेंचे जो जे करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ।’ या वचनानुसार आध्यात्मिक साधनेला महत्त्व देऊन या हिंदु राष्ट्राच्या कार्यात प्रत्येकाने सहभागी होणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सदगुरु नंदकुमार जाधव यांनी केले.

राणा दांपत्याची जामिनावर सुटका !

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांची १२ दिवसांनंतर ५ मे या दिवशी कारागृहातून जामिनावर सुटका करण्यात आली आहे. नवनीत राणा यांना होणाऱ्या मानेच्या त्रासामुळे त्या लीलावती रुग्णालयात भरती झाल्या आहेत.