ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांना ‘ब्राह्मणभूषण’ पुरस्कार घोषित !

पुणे, ५ मे – ‘आम्ही सारे ब्राह्मण’ आणि ‘ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका’ या दोन्ही नियतकालिकांच्या वतीने देण्यात येणारा ‘ब्राह्मणभूषण’ पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रसार करणारे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांना घोषित करण्यात आला आहे. याचसमवेत ‘इंदुमती वसंत करिअर भूषण’ पुरस्कार हिंदुत्वनिष्ठ चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना देण्यात येणार आहे. मानपत्र, पुणेरी पगडी, उपरणे असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती मासिकाचे मुख्य संपादक भालचंद्र कुलकर्णी यांनी दिली. सदरच्या नियतकालिकांचा वर्धापनदिन समारंभ ८ मे या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता आबासाहेब गरवारे सभागृह येथे होत आहे. या कार्यक्रमात शरद पोंक्षेलिखित ‘मी आणि नथुराम’ या पुस्तकाच्या १० व्या आवृत्तीचे लोकार्पण होणार असून त्यांची प्रकट मुलाखत प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ घेणार आहेत.