नालासोपारा येथील वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका दीड घंटा अडकली !

प्रतीकात्मक छायाचित्र

नालासोपारा – येथे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. ३ मे या दिवशी येथील उड्डाणपुलावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने एक रुग्णवाहिका त्यातच जवळजवळ १ ते दीड घंटा अडकून पडली. (रुग्णवाहिकेतील रुग्णाचे जर काही बरे-वाईट झाले असते, तर त्या स्थितीला कुणाला उत्तरदायी धरणार ? – संपादक) तेथील रस्त्यांवर फेरीवालेही मोठ्या प्रमाणात बसलेले असतात. त्यांचाही परिणाम वाहतुकीवर होतो. (पालिका प्रशासन या फेरीवाल्यांना हटवत का नाही कि ‘पालिकेचे त्यांच्याशी काही साटेलोटे आहे ?’ असा प्रश्न नागरिकांना पडू शकतो. प्रशासन आणि वाहतूक विभाग यांनी वाहतूक कोंडीच्या समस्येवर तत्परतेने उपाय काढावा, ही अपेक्षा ! – संपादक)