रामनाथी आश्रमात दास मारुतीच्या मूर्तीचे दर्शन घेतांना मला आलेल्या अनुभूती देत आहे.
१. मी मारुतिरायासमोर हात जोडून आणि डोळे मिटून उभा होतो. मी डोळे उघडून मूर्तीकडे पाहिल्यावर ‘मारुतिरायाच्या पापण्यांची हालचाल होत आहे’, असे मला जाणवले.
२. ‘तो आमच्याकडे पहात असून त्याच्या मुखावरील हावभाव पालटत आहेत’, असे मला जाणवले.
३. माझे मन मूर्तीवर एकाग्र झाल्यावर ‘मारुतिरायाचा श्वास चालू आहे’, असे मला जाणवले. तेव्हा मला शांत वाटत होते.
४. ‘मारुतीचे ध्यान सतत करावे’, असे मला वाटत होते.’
– श्री. सुधाकर नारायण पाध्ये, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१२.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |