भारताच्या आर्. प्रज्ञानंद याने बुद्धीबळ स्पर्धेत विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन यांवर केली मात !
भारताचा तरूण ग्रँडमास्टर आर्. प्रज्ञानंद (१६ वर्षे) याने बुद्धीबळ स्पर्धेत जागतिक क्रमवारीत प्रथमस्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसन यांच्यावर मात केली. ‘एअरथिंग्स मास्टर्स’ या ऑनलाईन बुद्धीबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत आर्. प्रज्ञानंद याने मॅग्नस कार्लसन यांचा ३९ चालींमध्ये पराभव करत विजय प्राप्त केला.