नगर येथील कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या १८ गोवंशियांची सुटका, २ धर्मांधांना अटक !

गोहत्या प्रकरणात नेहमी धर्मांधच सापडतात. गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही धर्मांधांना कठोर शिक्षा न झाल्यामुळे त्यांना गोहत्या करण्याची भीती वाटत नाही, हेच यातून सिद्ध होते. – संपादक

भातोडी शिवारात १९ फेब्रुवारी या दिवशी कत्तलीसाठी आणलेल्या १८ गायींची सुटका पोलिसांनी केली

नगर – येथील भातोडी शिवारात १९ फेब्रुवारी या दिवशी कत्तलीसाठी आणलेल्या १८ गायींची सुटका पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी आरोपी शाहरुख सय्यद, रिजवान पठाण या दोघांना अटक केली असून १० लाख रुपये मूल्याचा ट्रक, ३ लाख ३४ सहस्र रुपये मूल्याच्या गायी असा एकूण १३ लाख ३४ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस नाईक सचिन वनवे यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसांनी छापा टाकून 1 मोठा ट्रक व 18 गाई ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली

पोलिसांनी तपासणी केली असता ट्रकमध्ये पाय आणि मुंडके बांधलेल्या ३ जर्सी गायी, काही लहान जर्सी गायी, १ खिलार जातीची गाय आणि २ वासरे खाली काटेरी झुडपात डांबून ठेवलेल्या आढळून आल्या.