मुंबई – ‘इंडियाबुल्स’ या वित्तीय आस्थापनावर अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) २१ फेबु्रवारी या दिवशी धाड टाकण्यात आली. वर्ष २०१४ ते २०२० या कालावधीत ‘इंडिया बुल्स’ या आस्थापनाचे प्रवर्तक आणि संचालक यांनी आर्थिक अपहार केल्याच्या तक्रारीवरून यापूर्वी पालघर पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. ‘इंडियाबुल्स’शी संबंधित अन्य काही आस्थापनांचीही अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी केली जात आहे. या कारवाईसाठी देहली येथून ४ पथके मुंबईत आली आहेत.