बेळगाव येथे महाविद्यालयाच्या परिसरात हिजाबच्या समर्थनार्थ घोषणा देणारे ६ धर्मांध पोलिसांच्या कह्यात !

  • धर्मांध विद्यार्थिनींकडून हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न

  • प्रवेश नाकारताच धर्मांध पालकांकडून घोषणाबाजी

धर्मांधांची वाढती मुजोरी ! – संपादक 

ठिकठिकाणी न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवला जात असतांनाही पोलीस अशांवर जरब बसेल, अशी कारवाई का करत नाहीत ? – संपादक 

विद्यार्थिनींकडून हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न

बेळगाव, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – न्यायालयाने पुढील निर्णय येईपर्यंत शाळा-महाविद्यालयांत हिजाब वापरण्यावर बंदी घातली असतांना १७ फेब्रुवारी या दिवशी ‘विजया इन्स्टिट्यूट ऑफ पॅरा मेडिकल सायन्स’मध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनींनी हिजाब परिधान करून वर्गात जाण्याचा प्रयत्न केला. ‘वर्गात प्रवेश करावयाचा असेल, तर हिजाब काढावा लागेल’, असे त्यांना सांगण्यात आले; मात्र विद्यार्थिनी हिजाब घालण्यावर अडून बसल्याने त्यांना वर्गात प्रवेश नाकारण्यात आला. विद्यार्थिनींना वर्गाच्या बाहेर उभे करण्यात आले असल्याचे कळताच त्यांच्या पालकांनी महाविद्यालयात जाऊन महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाशी वाद घातला, तसेच जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता पाहून पोलिसांनी घोषणाबाजी करणार्‍या ६ जणांना कह्यात घेतले. (उच्च न्यायालयाने आदेश देऊनही त्याचे पालन न करणार्‍या विद्यार्थिनी आणि महाविद्यालयात घोषणाबाजी करून वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न करणारे त्यांचे पालक, हे देशातील कायद्यांना जुमानत नाहीत, हेच सिद्ध होते. न्यायालयाच्या आदेशाचेही पालन न करणार्‍यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी ! – संपादक)