‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेळगाव आणि खानापूर येथे निवेदन !

खानापूर येथे शिक्षणाधिकारी (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. कोनेरे कुम्रतवाडकर

बेळगाव (कर्नाटक) – ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात शिरस्तेदार परघी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु राष्ट्रसेनेचे श्री. रवि कोकीतकर, श्री. संतोष जाधव, श्री. विनायक हंर्गीगेकर, हमार देश संघटनेचे श्री. व्यंकटेश शिंदे, धर्मप्रेमी श्री. मारुति सुतार, सौ. मिलन पवार, सौ. अक्काताई सुतार, सौ. रूपा लोहार, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. उज्ज्वला गावडे, श्री. हृषिकेश गुर्जर आणि श्री. सुधीर हेरकेर उपस्थित होते.

खानापूर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी शरनेश जारळी यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ

खानापूर येथे उपतहसीलदार,शिक्षणाधिकारी, तसेच खानापूर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी शरनेश जारळी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी विश्व हिंदु परिषद तालुकाध्यक्ष श्री. गोविंदराव किरमिटे, श्री. विद्यानंद नार्वेकर, श्री. विष्णु बेळगावकर, श्री. मल्लीकार्जुन मुतगी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. कोनेरे कुम्रतवाडकर, श्री. संभाजी चव्हाण उपस्थित होते.