सातारा, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – श्रीक्षेत्र सज्जनगड येथे श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने १७ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत ‘दासनवमी उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. काकड आरती आणि श्रीराम पंचायतनाची महापूजा करून उत्सवाला प्रारंभ झाला.
१७ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत डॉ. अजित कुलकर्णी आणि पू. गुरुनाथ महाराज कोटणीस यांची प्रवचने होणार आहेत. याच कालावधीत सायंकाळी ४ ते ६ या वेळेत मकरंदबुवा रामदासी यांची कीर्तन सेवा होणार आहे. कोरोना महामारीमुळे विविध मान्यवर गायक-गायिकांची होणारी संगीत सेवा या वर्षी होणार नाही. तरी समस्त समर्थ भक्तांनी कार्यक्रमात सहभागी होऊन उत्सवाचा आनंद द्विगुणीत करावा, असे आवाहन समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह योगेशबुवा रामदासी यांनी दिली आहे.